Sunday, January 8, 2017

शेर

दुनिया सुधर गयी है आपके पधारनेसे
तश्रीफ़ न ले जाना तुम कही इस हादसेसे 

Wednesday, November 23, 2016

ए बिते सपने, 
तुम कल फिर आना
तुम्हे गौरसे देखा ही नही.

सुहाने हो तो मौज उठाउंगा
बुरे हो तो भूल जाउंगा

आखिर मनमानी तो सपनोंपेही चलती है
हकीकत पर नही.

Thursday, May 19, 2016

अनुरागने पाचवीत असताना लिहिलेली शास्त्राची काही उत्तरे
https://drive.google.com/file/d/0B-RFwj4BylvSMmhOb21ITE1Ba1E/view?usp=sharing
https://drive.google.com/open?id=0B-RFwj4BylvSMmhOb21ITE1Ba1E
https://drive.google.com/file/d/0B-RFwj4BylvSdHc2NzI1cU80clU/view?usp=sharing

Thursday, December 31, 2015

मन रमेना रमेना
सुख गावेना गावेना
घागर  पाण्याने भरली
पण तहान भागेना

तहान लागली कशाची 
काही उमगत नाही
सुखे पायाशी लोळती
मन कशातच नाही 

सुख हवे रे कोणते?
मना विचारी मी प्रश्न
मन हसून बोलले 
तुला नाही समाधान 

--- दीपक थिटे


माउली
टाकुनिया भार
सारा तुझ्यावर
आता मी जाहलो
पुरता नि:संग

            पुसती हे लोक
            कुठे हो विवेक ?
            तोही वाहीयला
            तुझ्या पायी

कोठून हा आला
कसा हो हा हर्ष?
की झाला मज
परिसाचा स्पर्श

            पाउस आटला
            सखे गेले हो पुढती
            तरी वाट पंढरीची
            पाऊले चालती

कुठे गेला ज्वर?
कसे आले त्राण?
प्राण चेतवून
विठू गेला

            हरपली भूक
            तहान भागली
            करता भजन
            माउली माउली

                                           दीपक थिटे

Friday, October 10, 2014

हे जग म्हणजे केवळ एक "पायाभूत सुविधा उपलब्ध असलेली प्रणाली" (system with infrastructure) आहे का? इथे पायाभूत सुविधा यांचा अर्थ "रस्ते, वीज, मुबलक पाणी" हा नाही; तर "मानवाला जगण्यासाठी आणि प्रजननासाठी लागणाऱ्या कमीत कमी साधनांची उपलब्धता" असा अपेक्षित आहे. त्यात मग "हवा, प्रकाश, पाणी" सगळे आले.

जगाची संकल्पना एवढ्यावरच थांबून संपली असती तर खरंच किती बरं झालं असतं . आयुष्य नक्कीच सुकर झालं असतं. पण नियती इतकी कनवाळू कशी असेल. या सगळ्या प्रणालीत "भाव भावना" नावाचं एक पिल्लू नियतीने टाकले आणि सगळाच मामला बिघडून गेला.

Thursday, September 12, 2013

खूप झाला प्रवास
आता थोडा दम खाऊ दे
खूप पुरवले पाणी
आता थोडेतरी पिऊ दे

धाव धाव धावलो
आता वेग मंदावू दे
ध्येय राहील क्षितीजापाशीच
आता थोडी उसंत घेऊ दे