माउली
टाकुनिया भार
सारा तुझ्यावर
आता मी जाहलो
पुरता नि:संग
पुसती हे
लोक
कुठे हो
विवेक ?
तोही
वाहीयला
तुझ्या
पायी
कोठून हा आला
कसा हो हा हर्ष?
की झाला मज
परिसाचा स्पर्श
पाउस
आटला
सखे गेले
हो पुढती
तरी वाट
पंढरीची
पाऊले
चालती
कुठे गेला ज्वर?
कसे आले त्राण?
प्राण चेतवून
विठू गेला
हरपली
भूक
तहान
भागली
करता भजन
माउली
माउली
दीपक
थिटे
No comments:
Post a Comment