Thursday, September 12, 2013

खूप झाला प्रवास
आता थोडा दम खाऊ दे
खूप पुरवले पाणी
आता थोडेतरी पिऊ दे

धाव धाव धावलो
आता वेग मंदावू दे
ध्येय राहील क्षितीजापाशीच
आता थोडी उसंत घेऊ दे

Thursday, June 20, 2013

त्यांनी क्लास ची जाहिरात न करण्याचीच इतकी जाहिरात केली कि जाहिरात करूनही इतकी जाहिरात झाली नसती.