Friday, October 10, 2014

हे जग म्हणजे केवळ एक "पायाभूत सुविधा उपलब्ध असलेली प्रणाली" (system with infrastructure) आहे का? इथे पायाभूत सुविधा यांचा अर्थ "रस्ते, वीज, मुबलक पाणी" हा नाही; तर "मानवाला जगण्यासाठी आणि प्रजननासाठी लागणाऱ्या कमीत कमी साधनांची उपलब्धता" असा अपेक्षित आहे. त्यात मग "हवा, प्रकाश, पाणी" सगळे आले.

जगाची संकल्पना एवढ्यावरच थांबून संपली असती तर खरंच किती बरं झालं असतं . आयुष्य नक्कीच सुकर झालं असतं. पण नियती इतकी कनवाळू कशी असेल. या सगळ्या प्रणालीत "भाव भावना" नावाचं एक पिल्लू नियतीने टाकले आणि सगळाच मामला बिघडून गेला.